केजक्राईम डायरी

मोटार सायकलवरून पाठलाग करून जीवे मारण्याचा प्रयत्न

जखमींची प्रकृती चिंताजनक: लातूरला हलविले

गौतम बचुटे/केज :- एका मोटार सायकलस्वराचा तिघांनी पाठलाग करून त्याला रस्त्यात अडवून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली असून मारहाणीत एकजण गंभीर बखमी झाला आहे जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्याला लातूर येथे हलविण्यात आले आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ९ एप्रिल शनिवार रोजी साने गुरुजी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वस्तीगृहाचे कर्मचारी रमेश एकनाथ नेहरकर वय ४५ वर्ष रा पिसेगाव ता. केज जि. बीड हे त्यांच्या मोटार सायकल क्र. (एम एच -४४/एफ-४८३२) वरून केज कळंब महामार्ग क्र. ५४८ सी वरून कळंब कडून केजकडे येत असताना दुपारी ३:३० वा च्या दरम्यान त्याच्या पाठीमागून एका डिस्कव्हर मोटार सायकलवरून आलेल्या भास्कर चाटे व इतर दोघांनी त्याचा पाठलाग केला. हल्लरखोरांनी रमेश नेहरकर याच्या पाठी मागून चालत्या गाडीवर त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून जखमी केले. त्याला मारून तो खाली पडताच हल्लेखोर मोटार सायकली वरून केजच्या दिशेने फरार झाले. अचानक झालेल्या हल्ल्याने रमेश नेहरकर खाली रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यात रॉड मारल्याने झालेल्या जखमेतून रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध पडला होता.
दरम्यान या रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी माहिती दिल्यामुळे ही माहिती केज पोलीसांना मिळताच; सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस नाईक अशोक नामदास हे घटना स्थळी पोहोचले. जखमी रमेश नेहरकर याला रुग्णवाहिकेतून केज येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविले मात्र जखमी रमेश नेहरकर याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला लातूर येथे हलविले असल्याची माहिती मिळते आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भागवत चाटे आणि दोन अनोळखी यांच्या विरुद्ध गु. र. नं. ११४/२०२२, भा. दं. वि. ३०७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.  प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!