जिल्ह्याचं राजकारणमाजलगाव

माजलगावात शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी; जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखात रस्त्यावर मारामारी

माजलगाव/प्रतिनिधी:
नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची गुरूवारी ( दि. २४) सकाळी माजलगावात शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीवरून नाराज असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख धनंजय (पापा) सोळंके यांनी मिरवणूकीत घुसून जिल्हाप्रमुख जाधव यांना काळे वंगण फासण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी जाधव समर्थक शिवसैनिकांनी सोळंकेंना चांगलाच चोप दिला. यामध्ये सोळंके जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला आणि पाठीलाही मार लागला आहे. या प्रकारामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख आप्पासाहेब जाधव व शहर प्रमुख धनंजय (पापा)सोळके या दोघांची गेल्या अनेक दिवसापासून मतभेद आहेत. पक्षाच्या अनेक कार्यक्रमात दोघांमधील गटबाजी नेहमीच पाहायला मिळत आली आहे. दरम्यान आप्पासाहेब जाधव यांची पक्षाने जिल्हाप्रमुख पदी निवड केली. या निवडीच्या निषेधार्थ शहर प्रमुख पापा सोळंके यांनी आपल्या भावना पक्षप्रमुखाकडे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या दोन दिवसाच्या कालावधीत नवनिर्वाचित जिल्हा जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव मुंबईच्या दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन ते गुरुवारी माजलगाव शहरात आले. यावेळी स्थानिक शिवसैनिकांनी त्यांची संभाजी चौक येथून जंगी मिरवणूक काढली. यावेळी शहर प्रमुख धनंजय (पापा) सोळंके काळे वंगण घेऊन निवडीचा निषेध करत मिरवणुकीत घुसले आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांना काळे लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकत्यांनी पापा सोळंके यांना अडवून बेदम मारहाण केली. झालेल्या मारहाणीत सोळंके यांचे डोके फुटले असून त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे. दरम्यान या निवडीच्या या वादावरून शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!