क्राईम डायरीगेवराई

शेतीच्या वादातून तुंबळ हाणामारी

गेवराई/प्रतिनिधी:

शेत जमिनीच्या बांधावरुन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील लुखामसला बुधवारी घडली. यात तिघे जण जखमी आहेत. तालुक्यातील लुखामसला शिवारात गट नं.१६ मध्ये सविता थोरात यांची जमीन असून या रस्त्यावरून सविता थोरात व त्यांची दोन मुले अनुराज थोरात, केशव थोरात यांनी शेतात ऊस लागवडीसाठी ट्रॅक्टरमधून बेणे नेले. दरम्यान तुम्ही रस्त्यावरून ट्रॅक्टर का नेला, या कारणावरून शुभम वसंत व्हरकटे, वसंत व्हरकटे, नंदकुमार अंकुश सरगर, रावसाहेब दगडूबा व्हरकटे, करण वसंत व्हरकटे, रेखा वसंत व्हरकटे, दिव्या वसंत व्हरकटे यांनी वाद घातला. यानंतर संगनमत करुन काठी कुऱ्हाडीने थोरात बंधूंसह त्यांच्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनुराज याला डोक्यात कुऱ्हाडीचा गंभीर घाव लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. तर आई सविता व केशव यांना देखील काठीने जबर मारहाण करण्यात आल्याने ते देखील जखमी झाले. जखमी तिघांनाही गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करुन अनुराज याला गंभीर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जखमींनी पोलीस ठाणे गाठून वरील आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र ठाणे अंमलदार व बीट अंमलदार यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने जखमींनी ठाण्यात ठिय्या मांडला. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र पेलगुरवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी तुमच्यावर अन्याय होणार नाही, आरोपींवर योग्य कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन दिल्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!