केजक्राईम डायरी

केजमध्ये हाणामारी; परस्पर विरोध गुन्हे

केज /प्रतिनिधी

शेतात महिला काम करतात, लघुशंकेस बसू नको असे म्हणाल्यावरून चौघांनी लोखंडी रॉड व दगडाने केलेल्या मारहाणीत तिघांचे डोके फुटल्याची घटना केज – अंबाजोगाई रस्त्यावर घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील हनुमान गल्ली भागातील विनोद ज्ञानोबा शिंदे यांची जमीन केज – अंबाजोगाई रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालयाच्या दक्षिण बाजूस आहे. २ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास सागर गणेश डिकोळे हा त्यांच्या शेतात लघुशंकेसाठी गेला असता त्यास तू इथे लघुशंका करू नको, शेतात महिला काम करीत आहेत. असे म्हणाले असता अमोल संजय शिंदे याने हा इथेच लघुशंका करणार असे म्हणून शिवीगाळ करीत चापटाबुक्याने मारहाण केली. तर संदीप शामराव शिंदे व सारंग संदीप शिंदे या दोघांना फोनवरून बोलावून घेतले. त्यानंतर सागर डिकोळे याने विनोद शिंदे यांना पाठीमागून पकडून ठेवत संदीप शिंदे यांनी लोखंडी रॉड डोक्यात मारून विनोद शिंदे यांचे डोके फोडून गंभीर जखमी केले. तर अमोल शिंदे व सारंग शिंदे या दोघांनी दगड फेकून मारून त्यांचे भाऊ प्रवीण शिंदे व प्रमोद शिंदे यांचे डोके फोडले. त्यांचा पुतण्या प्रशांत प्रमोद शिंदे हा भांडण सोडविण्यास आला असता त्यास ही शिवीगाळ करून चापटाबुक्याने मारहाण केली. अशी फिर्याद विनोद शिंदे यांनी दिल्यावरून अमोल शिंदे, सागर डिकोळे, संदीप शिंदे, सारंग शिंदे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे ह्या करीत आहेत.

दुसऱ्या गटाची ही तक्रारी

दुसऱ्या गटाचे संदीप शामराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोद ज्ञानोबा शिंदे, विनोद ज्ञानोबा शिंदे, प्रशांत प्रमोद शिंदे, प्रवीण ज्ञानोबा शिंदे, अभिजीत अनिल सत्वधर यांनी तू आमचे शेत खाल्ले अशी भांडणाची कुरापत काढून संदीप शिंदे व त्यांच्या पुतण्यास शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. तर प्रशांत शिंदे याने लोखंडी रॉडने त्यांच्या दोन्ही हाताच्या बोटावर मारहाण करून जखमी केले. विनोद शिंदे यांनी पाठीमागून धरून मारहाण मारहाण करीत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. अशी फिर्याद संदीप शिंदे यांनी दिल्यावरून प्रमोद शिंदे, विनोद शिंदे, प्रशांत शिंदे, प्रवीण शिंदे, अभिजीत सत्वधर यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणीही पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती केज पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!