केजक्राईम डायरी

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून मिरवणूक काढली; केज येथे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह कार्यकत्यावरवर गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या निवडी नंतर मिरवणूक काढली. ती मिरवणूक चांगलईच अंगलट आली असून पदभार स्वीकारण्या पूर्वीच केजच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व त्यांच्या समर्थकासह २०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. १४ फेब्रुवारी रोजी केज येथील उपनगराध्यक्ष यांच्या निवडीं नंतर मिरवणूक काढली वास्तविक मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी जिल्ह्यात १० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी पर्यंत जमाव बंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश जा. क्र. २०२३/आरबी-डेस्क -१/ पोल -१ / कावि अनुषंगाने बीड जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे मनाई आदेश लागु आहे. त्यामुळे समर्थका कडुन मिरवणुक काढण्यात येऊ नये. कोणतेही डि.जे., डॉल्बी लावुन गाणे वाजवु नये. या बाबत आज दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे केज येथील प्रभारी अधिकारी यांनी सी आर पी सी कलम १४९ प्रमाणे समजपत्र दिले होते. तसेच त्यांना प्रत्यक्ष भेटुन सदर बाबत अवगत केले होते. दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० वा. पोलीस उपनिरीक्षक पाटील व सोबत सहाय्यक फौजदार महादेव गुजर, उमेश आघाव,  रमेश सानप, मंगेश भोले, शेख, म्हेत्रे, महादेव बहीरवाल यांनी नगराध्यक्षपद निवड बंदोबस्तकामी नगर पंचायत कार्यालय केज येथे हजर होते. केज नगर पंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड, नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा सौ. शितलताई दांगट, नगरसेवक पती हारुन इनामदार, अंकुश इंगळे, आदीत्य अशोकराव पाटील, नगरसेवक पती पशुपतीनाथ दांगट, सोमनाथ गुंड,  नगरसेवक पती – सुग्रीव कराड, पल्लवी रांजनकर, पदमीन शिंदे, शकील ईनामदार यांनी नगरपंचायत केज समोर १५० ते २०० कार्यकर्ते जमवुन दुपारी १:०० ते ४:३० वा. पर्यंत चारचाकी वाहन क्र.म (एमएच-४४/यु-९७९) व चारचाकी वाहन क्र. (एमएच-०३/एच-३६१९) वर वरील अमलदोकांनी बसुन व समोर १५० ते २०० कार्यकर्ते हे चालत नगर पंचायत केज समोरुन निघुन मंगळवारपेठ कॉर्नर ते धारुर चौक परत बसस्टँड मार्गे शिवाजी चौक ते कळंब रोड मार्गे फुले नगर ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत ढोल – ताशा, बँड वाजवुन व फटाके फोडुन विजयी मिरवणुक काढली. सदर प्रकरणी गोपनिय शाखेचे अंमलदार  मतीन शेख यांचे मार्फत शासकिय व्हिडीओ कॅमेरा व्दारे  व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आलेले आहे.

त्या दरम्यान सदर नवनिर्वाचित सदस्यांना वारंवार मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेशाने बीड जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे मनाई आदेशबाबत तसेच सदर आदेशान्वये प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या नोटीस बाबत अवगत करुन त्यांनी नियमांचे पालन करणे बाबतच्या सुचना देऊन सुध्दा १५० ते २०० गैरकायद्याचा जमाव जमवुन सदर आदेशाचे उल्लंघन करुन त्यांनी सदर विजयी मिरवणुक चालु ठेवली. म्हणून पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु र नं ३९/२०२२ भा दं वि. १४३, १८८ व १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!