बीड

अन्नधान्य,मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून घडविले माणूसकीचे दर्शन

बीड / प्रतिनिधी
तालुक्यातील इन्फण्ट इंडिया आनंदग्राम या पाली येथील संस्थेत एचआयव्हीसह आयुष्य जगणाऱ्या अनाथ मुला-मुलींसोबत टायगर ग्रुप मराठवाडा यांनी पुढाकार घेऊन अंबाजोगाई येथील ग्रुपचे सदस्य बालाजी सिध्देश्वर रूद्राक्ष यांचा सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा करून विधायक संदेश दिला.त्यानिमित्ताने आनंदग्राम येथे अन्न-धान्य,फळे,मास्क,सॅनिटायझर या साहित्यासह चिमुकल्यांना खाऊ देखिल वाटप करण्यात आला.

बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील इन्फण्ट इंडिया आनंदग्राम हा एचआयव्हीग्रस्त मुलांचा सांभाळ करणारा प्रकल्प आहे.या प्रकल्पात एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांचे संगोपन आनंदग्रामचे संचालक दत्तामामा बारगजे व संध्याताई बारगजे यांनी स्व.डॉ.बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून सुरू केले आहे.एचआयव्ही बाधितांची सेवा करण्याचे,त्यांना सक्षम करून समाजात सन्मानाने जीवन जगण्याची संधी निर्माण करण्याचे सेवाव्रत हाती घेतले आहे.हे अत्यंत महान कार्य आहे.अशा ठिकाणी टायगर ग्रुपकडून आपल्या आनंदात सहभागी करून घेत अन्न-धान्य,फळे,मास्क,सॅनिटायझर या साहित्यासह खाऊ वाटप करून आपुलकीने विचारपूस केलेल्या आत्मिय संवादाने यावेळी चिमुकले भारावून गेले होते.कळत-नकळत जन्मदात्यांकडून झालेल्या चुकीची शिक्षा भोगणाऱ्या व एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या मुला-मुलींना संध्याताई बारगजे व दत्तामामा बारगजे या दाम्पत्याने “इन्फण्ट इंडिया आनंदग्राम” या संस्थेत आश्रय दिला आहे.सध्या ८५ मुले-मुली तेथे वास्तव्यास आहेत.एचआयव्हीबाधित असल्याने समाज व कुटुंबाकडून दुर्लक्षित झालेल्या या चिमुकल्यांचे या संस्थेत पालन-पोषण केले जाते.उपचार सुविधांसोबतच शिक्षणही देण्यात येते.या संस्थेच्या कार्याने प्रभावीत झालेल्या टायगर ग्रुपचे मराठवाडा अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर या संवेदनशील युवकाने त्यांचे मिञ व ग्रुपचे सदस्य बालाजी सिध्देश्वर रूद्राक्ष यांचा मिञ परीवारासह वाढदिवस साजरा करण्याचे नुसते ठरवलेच नाही तर ते प्रत्यक्ष कृतीतही आणले आणि त्याच संकल्पनेतून हा उपक्रम राबविला.टायगर ग्रुप यांच्यामुळे सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा झाला.एका डोळ्यांत आसू व दुसऱ्यात हसू अशा वातावरणात अन्न-धान्य,फळे,मास्क,सॅनिटायझर या साहित्यासह खाऊ वाटपाचा उपक्रम संपन्न झाला.टायगर ग्रुप,मराठवाडा यांनी सदस्य बालाजी सिध्देश्वर रूद्राक्ष यांचा सामाजिक दृष्टिकोन ठेवून वाढदिवसानिमित्त राबविलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविणारा असल्याची भावना इन्फंटचे संचालक दत्तामामा बारगजे यांनी व्यक्त केली.तर यापूर्वी आपण “इन्फण्ट इंडिया आनंदग्राम” या संस्थेबद्दल ऐकले होते.संस्थेला भेट दिल्यावर बारगजे दाम्पत्याचे कार्य जवळून पाहता आले.सरकारी नोकरी सोडून जे कुटुंब एचआयव्ही बाधितांसाठी आयुष्य वाहून घेते,त्यांना हातभार म्हणून हा उपक्रम घेतला.अशा सामाजिक प्रकल्पांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे अशी सद्भावना उमेशभाऊ पोखरकर यांनी व्यक्त केले.याप्रसंगी आदित्य देशमुख,दिपक लामतुरे,स्वप्निल सोनवणे,महादेव मोरे,अक्षय धारेकर, कृष्णा नरसिंगे, तिरूपती राठोड, संतोष भाऊ डागा, गजानन गुजर, बाळासाहेब सुरवसे, अविनाश जाधव, अतुल कारंडे,सोमेश शिंदे आदींसह टायगर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!