देवळा येथे गोरगरिबांना साहित्य वाटप

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
तालुक्यातील देवळा येथे कोरोना स्थिती आणि लॉकडाऊन च्या काळात हाताला कामनसणारे असह्य वयोवृद्ध, परित्यागत्या, विधवा , शेतमजूर, यांना सामाजिक बांधिलकी जपत दैनंदिन लागणारे साहित्य व अन्नधान्य किट गुंज सामाजिक संस्था यांच्या वतीने वाटप करण्यात आले.
गेल्या वर्षी ही सारसा आणि देवळा गावात लॉकडाउनच्या काळात अन्नधान्य किट वाटप करण्यात आल्या होत्या वर्षी सारसा गावामध्ये अठ्ठावीस तर देवळा येथे एकतीस दैनंदिन साहित्य आणि अन्नधान्य किट वाटप करण्यात आले , या वेळी मास्क आणि साबणाने स्वच्छ हात धुवावे , कोरोना प्रतिबंधक लस घ्या, कोरोना आजार विषयी घ्यावयाची काळजी विषयी मार्गदर्शन रविंद्र देवरवाडे देवळा श्रमकरी फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले , गुंज संस्थेच्या माध्यमातून केले कार्य अजित कांकरिया यांनी सांगितले तर ऍड परमेश्वर भिसे ,ऍड सुखधा भिसे कायदे सल्लागार समिती सदस्य मुबंई महानगरपालिका ,सुदर्शन कदम, अरविंद कदम , गुंज संस्थेचे व्यंकटेश यमुगँटी, प्रतिभ वाघमारे, अशोक गिरी ,बाबासाहेब यशवंत ,ह भ प भाऊसाहेब खामकर महाराज , या पुढे ही सामाजिक बांधिलकी जपत सारसा देवळा गावात श्रमदानातून गुंज संस्था आणि देवळा श्रमकरी फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक ,आरोग्यदायी, आणि शैक्षणिक कार्य करण्यात येणार आहे