केजक्राईम डायरी

केज तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग : नराधमा विरुद्ध गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात एका तेरा वर्षीय अनुसूचित जातीच्या अल्पवयीन मुलीचा गावातील एका नराधमाने विनयभंग करून अतिप्रसंग करून जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादी वरून त्या नराधमाला विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह बाल लैंगिक अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १८ मे रोजी केज तालुक्यातील पिसेगाव येथील एक तेरा वर्ष वयाची अल्पवयीन ही रात्री ९:३० वा. च्या दरम्यान तिच्या घरा समोरील रस्त्यावर बसलेली होती. त्यावेळी धनराज नेहरकर याने अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे ती घरी निघून जात असताना नराधम धनराज याने तिचे केस धरून खाली पाडले व तिच्याशी झोंबाझोंबी करून तिचा विनयभंग केला. अल्पवयीन मुलीने त्यास ढकलून दिले असता त्याने तिच्यावर अतिप्रसंग करून तिला व तिच्यासह वडिलांना जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच अनुसूचित जातीच्या महिलांनी त्याच्या दारातून वागायचे नाही अशी धमकी दिली.
या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलगी व तिची आई यांनी केज पोलीस ठाणे गाठून पोलीस अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्या नुसार दि. १९ मे रोजी पोलीस अमलदार पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून घेतला आहे. नराधम धनराज नेहरकर यांच्यावर पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादी वरून गु. र. नं. १०१/२०२२ भा. दं. वि. ३५४, ३५४(अ), ३२३, ५०४ ५०६ यासह बाललैंगिक अत्याचार कायदा २०१२ आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३(१), (आर)(एस) (डब्ल्यू) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!