पत्नीच्या छळाला कंटाळून वनरक्षक पतीची आत्महत्या

पत्नीसह चौघांवर गुन्हा
आष्टी/ प्रतिनिधी:
नोकरीचे पैसे आई-वडीलास का दिले व त्याचा हिशोब न दिल्याने तसेच आई-वडीलास फरशी व ठोकळा का घेऊन दिला. या कारणामुळे पत्नीने वेळोवेळी दिलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून वनरक्षक असलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पत्नीसह चौघांवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. अनील बाबासाहेब जगतात ( वय 30) असे त्या मयत वनरक्षकाच्या नाव आहे.
त्यांचे वडील आबासाहेब जगताप यांच्या फिर्यादीनुसार अनिल यांचा विवाह 2014 साली देसुर येथील अजिनाथ देवराव भवर यांची मुलगी अश्विनी हिच्यासोबत झाला होता. अवघ्या दहा दिवसातच ते दोघे अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी शिरूर कासार येथे राहण्यासाठी गेले. त्यानंतर पती-पत्नी सातत्याने वाद होऊ लागला. पत्नी अगोदरच्या पगाराच्या खर्चाचा हिशोब मागू लागली तसे तुमच्या आई वडिलांना पैसे द्यायचे नाही असेही तिने बजावले. अखेर या सततच्या छळाला कंटाळलेल्या अनिलने 28 मे रोजी दुपारी तीनच्या नंतर कधीतरी श्रृगेंरी देवीच्या समोरून जाणार्या मुगगाव रोडवर एका वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 29 मे रोजी उघडकीस आली. सदर फिर्यादीवरून अजिनाथ देवराव भवर, विजूभाई आजिनाथ भवर, अश्विनी अनिल जगताप आणि महेश अजिनाथ भवर या चौघांवर शनिवारी (19 जून) अनीलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आष्टी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.