अंबाजोगाई
माजी नगरसेवक गौतम बप्पा सरवदे यांचे निधन

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक गौतम बप्पा सरवदे ( वय ५५) यांचे हृदयविकार च्या झटक्याने
येथील स्वाराती शासकीय रुग्णालयात सोमवारी ( दि. ७) पहाटे निधन झाले.
गौतम बप्पा यांनी येथील मिलींद नगर प्रभागाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करण्याबरोबरच त्यांनी बांधकाम, पाणी-पुरवठा सभापती म्हणून अंबाजोगाई नगरपालिकेची धुरा संभाळली होती. शहरातील सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहीलेला आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, चार मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते दत्ता सरवदे यांचे ते वडिल होत.
मुकुंदराज रस्त्यावर असलेल्या दासोपंत समाधी समोरील जागेत साेमवारी दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.