क्राईम डायरीपरळी

परळीत चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या !

परळी/ प्रतिनिधी
शहरातील काही वसाहती समोर नागरिकांनी लावलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.


परळी शहरातील तुळजाई नगर, कृष्णाई नगर, गणेशपार नगर भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या चार चाकी गाड्या रस्त्याच्या बाजूला लावल्या होत्या. शनिवारी रात्री रस्त्याच्या बाजूला लावलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा रॉड व दगडाने फोडत अज्ञात माथेफिरूंनी गाडीचे मोठे नुकसान केले आहे. या परिसरात पोलिसांचे पेट्रोलिंग नसल्याने वारंवार या भागात चोऱ्यांचे प्रकार घडतात असे नागरिकांचे म्हणणे आहे. गाड्या फोडण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!