क्राईम डायरीबीड
ओटीपी विचारून शिक्षीकेला १ लाख ३० हजारांचा गंडा

बीड/ प्रतिनिधी: क्रेडिट कार्ड विषयी माहिती विचारायचे आहे असे सांगून मोबाईल राहिलेला ओटीपी विचारून शहरातील एका उर्दू शाळेतील शिक्षकेची फसवणूक करत त्यांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार ३६७ रुपयांची रक्कम काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील एका उर्दू शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकेला क्रेडिट कार्ड विषयी माहिती विचारायाची आहे असे कारण सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला.ओटीपी सांगताच त्यांच्या खात्यातील १ लाख ३१ हजार ३६७ रुपयांची रक्कम काढून फसवणूक केली. या प्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.