अंबाजोगाईक्राईम डायरी

इसाराचे १९ लाख रुपये घेऊन जमीन नावावर करून देण्यास टाळाटाळ; महिलेविरुद्ध गुन्हा

भारज येथील घटना

अंबाजोगाई: तालुक्यातील भारज येथील जमिनी विकत घेण्यासाठी १९ लाख रुपये देऊन इसार पावती करून घेतली परंतु दिलेल्या ठराविक मुदतीत जमीन नावावर करून न देता इसार पावतीसाठी घेतलेले १९ लाख रुपये परत न दिल्यामुळे महिलेविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील भारज येथील ताराचंद श्रीमंत शिंदे यांनी गावातील गट क्रमांक १३ मधील ३ हेक्टर ०४.५० एवढी जमीन ५२ लाख रुपयाला कायम विकत घेण्याचा ठराव पदमीनबाई लिंबाजी माने (रा. महापूर ता. जि. लातूर) यांच्यासोबत २७ मार्च २०१५ रोजी केला होता. ही जमीन विकत घेण्यासाठी शिंदे यांनी १९ लाख रुपये इसार म्हणून देऊन १०० बॉण्ड रुपयांचा मुद्रांक पेपरवर ठराव करून घेतला होता. उर्वरित ३० लाख रुपये डिसेंबर २०२१ पर्यंत देऊन कायमस्वरूपी खरेदी करण्याचे ठरवले होते. परंतु पद्मिनीबाई माने हिने ठरवल्याप्रमाणे रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ करून इसार पावती म्हणून दिलेले १९ लाख रुपये परत न देता फसवणूक केली. याप्रकरणी ताराचंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून पद्मिनीबाई लिंबाजी माने (रा. महापूर ता. जि. लातूर) हिच्या विरुद्ध बर्दापुर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!