अंबाजोगाई

उपचारा दरम्यान आईचाही मृत्यू, बागझरी विषबाधा प्रकरण

अंबाजोगाई: तालुक्यातील बागझरी येथे विषबाधा झाल्याने एकाच कुटूंबातील चौघांना उपचारासाठी येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन मुलांचा सकाळीच मृत्यू झाला तर उपचार घेत असलेल्या आईचा ही सायंकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान ही घटना माहीत झाल्यानंतर पोलीस अधिक्षक आर. राजा यांनी रुग्णालयास भेट देऊन या घटनेची माहीती घेतली.

बागझरी येथील काशीनाथ धारासुरे यांच्या कुटूंबातील पत्नी, दोन मुली व एक मुलगा यांना विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळीच साधना, श्रावणी व नारायण या मुलांचा मृत्यू झाला तर सायंकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान भाग्यश्री काशीनाथ धारासुरे ( वय 28)  यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!