अंबाजोगाईकृषी

सोमनाथ बोरगाव येथे फळबाग लागवड प्रशिक्षण संपन्न

अंबाजोगाई/प्रतिनिधी:

कृषी विभागामार्फत २१ जून ते १ जुलै पर्यंत “कृषी संजीवनी सप्ताह” मोहीम राबवून कृषी विभागाच्या योजनांची व खरीप हंगामातील पिकांच्या व्यवस्थापनाची माहिती देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील शेतकरी प्रमोद जोगदंड यांच्या शेतावर मेळावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी पर्यवेक्षक सुरेश ढाकणे यांनी अण्णासाहेब येडे यांच्या मनोगतातून शेततळे योजनेचा फळबाग जोपासण्यासाठी व उत्पन्न शाश्‍वत ठेवण्यासाठी कसा फायदा झाला याची यशोगाथा उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितली आणि पोकरा प्रकल्पांतर्गत असलेल्या विविध योजनांची विस्तृतपणे माहिती देऊन अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. कृषी सहाय्यक पंडित काकडे यांनी बीजप्रक्रिया, रासायनिक तण व्यवस्थापन, निंबोळी अर्क तयार करणे, सोयाबीन पिकातील कीड-रोग व्यवस्थापन, रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचे फायदे तसेच कृषी सहाय्यक डी आर रांजणकर यांनी ऊस खत व्यवस्थापनाची माहिती दिली. प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाने फळबाग लागवड विषयी मार्गदर्शन करून आंबा फळबाग लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखवले यासाठी खड्ड्यामध्ये निंबोळी पेंड, चोपण जमीन असल्यामुळे जिप्समचा वापर आणि प्रतिकूल वातावरणामध्ये झाडाने टिकाव धरण्यासाठी सिंगल सुपर फॉस्पेट वापरण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाला पोलीस पाटील उद्धवराव सोमवंशी कृषी सहाय्यक अनील तट, भगवान जोगदंड, राहुल सोमवंशी, विष्णू येडे, सुधाकर येडे, रोहन जोगदंड, जगन्नाथ जाधव, रमेश जोगदंड, बाळासाहेब आव्हाड आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!