क्राईम डायरीपरळी

न्यायधीश व्हायचे पूजाचे स्वप्न राहिले अधुरे

विजेचा धक्का लागून मृत्यू

परळी / प्रतिनिधी

न्यायाधीशाची परीक्षा पास झालेल्या तरूणीचा गुरुवारी (दि.१०) विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. पूजा वसंत मुंडे (वय २५) असे मयत तरूणीचे नाव आहे.

घरातील वरच्या मजल्यावरील रुमचे दार उघडे असल्याचे लक्षात आल्यावर दार बंद करण्यासाठी पूजा रुमकडे गेली. पावसाचे पाणी रूममध्ये साचलेले होते. पूजा ही दरवाजा बंद करण्यासाठी रुममध्ये जाताच विजेचा बोर्ड भिजल्याने बोर्डातून रुममध्ये वीजप्रवाह उतरलेला असल्याने विजेचा धक्का बसून पुजाचे निधन झाले. एल.एल.एम शिक्षणानंतर २०२० मध्ये न्यायाधीश पदाच्या परीक्षेत मुलींमधून राज्यात दुसरी, तर सर्वसाधारणमध्ये राज्यात १० वा क्रमांक पटकावला होता. तिची न्यायाधीश होण्याची स्वप्न अधुरेच राहिले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!