मत्स्यमारी ठेका भ्रष्टाचार व गैरकारभार प्रकरणी अहवाल सादर करण्याचे जिल्हा दंडाधिकारी यांचे निर्देश

माजलगाव / प्रतिनिधी: उपविभागीय जलसंधारण अधिकारी डी. एल. अंजान यांनी जिल्हा परिषद तलावांचे मत्स्यमारी ठेके माजलगाव तालुक्यातील टाकरवन क्र. १ व २ लघुसिंचन मत्स्य ठेके हे नियमबाह्य पद्धतीने दिल्याचे निवेदन देऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण निसार खातीब यांनी दि. ८/२/२०२२ व ९/२/२०२२ रोजी केले आहे.
वरील विषयी अधिक माहिती अशी की, मत्स्यमारी ठेका भ्रष्टाचार व गैर कारभार प्रकरणी लघु पाटबंधारे उपविभागीय अधिकारी डि. एल. अंजान यांची तात्काळ चौकशी करून निलंबित करण्यात यावे यासाठी आमरण उपोषण उपोषणकर्ते निसार खतीब यांनी केले व जिल्हादंडाधिकारी यांना निवेदन दि.२७/१/२०२२ रोजी देऊन मागणी करण्यात आलेली आहे. तरी संबंधित उपोषणकर्त्याला निवेदनातील नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने तथ्य तपासून सविस्तर चौकशी करून आपला स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल तीन दिवसात कार्यालयाला सादर करावा. असे जिल्हा दंडाधिकारी यांनी निर्देश दिल्यामुळे वरील उपोषणकर्ते यांनी दि.९/२/२०२२ रोजी अमरण उपोषण हे अहवाल येई पर्यंत मागे घेतलेले आहे.