विद्यार्थ्यांनी ध्येय्य साध्य करण्यासाठी मेहनत आणि परिश्रमाची पराकाष्ठा करावी — सपोनि शंकर वाघमोडे

गौतम बचुटे/केज :- विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि आपले उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत घेतल्यास यश निश्चित प्राप्त होते. असे प्रतिपादन केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. तर पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे म्हणाले की, १२ वीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी एक वळणाचा टप्पा असून त्यातून उद्याचे भवितव्य घडविणारे विद्यार्थी व नागरिक घडला जातो.
केज येथे छत्रपती शिक्षण संस्था आडस संचलित वसंत कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साखरे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, प्राचार्य नखाते सर, उपप्राचार्य चव्हाण सर, समुद्रे सर, साखरे सर, चाळक, पोटभरे सर, धपाटे सर, साबळे सर, शिंदे मॅडम, मोगले मॅडम व पत्रकार गौतम बचुटे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वेळेचे नियोजन करून अभ्यास केला तर आपल्या पालकांच्या आपल्याप्रतीअसलेल्या अपेक्षाचे ध्येय पूर्ण करू शकू. अपयशाने खचून न जाता त्याचा सामना करता यायला हवा. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर अपेक्षित यश मिळवता येते. तसेच मोबाईलचा वापर हा नवनवीन माहिती मिळविण्यासाठी करायला हवा. असे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी सांगितलें की, १२ वी हे आपल्या भवितव्याला वळण देणारा टप्पा असून आपण योग्य मार्गदर्शन आणि अध्ययन यातून सहज आपले उचित ध्येय गाठू शकतो. मात्र त्यासाठी चिकाटी हवी असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना त्यांचे शिक्षक व पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प केला.