केजक्राईम डायरी

बहीण भावास मोटार सायकल अडवून गळ्यातील गंठण पळविले : एकास पोलीसांनी घेतले ताब्यात

एकास पाच दिवसांची पोलीस कोठडी

गौतम बचुटे/केज :-  रात्रीच्या वेळी मोटार सायकलवर जात असलेल्या बहीण भावास अडवून महिलेच्या गळ्यातील मिनीगंठण हिसकावून पळून गेले. त्यातील एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २ एप्रिल शुक्रवार रोजी अशोक सकींदर घुले रा शिरूरघाट ता. केज हे हंगेवाडी येथून त्यांची बहीण शुभांगी दादासाहेब आंधळे हिला मोटार सायकल क्र. (एम एच-४४/एक्स-३७४०) वरून माहेरी शिरूर घाट येथे घेऊन येत होते. रात्री १०:०० ते १०:३० वा. च्या दरम्यान नांदूरघाट येथील कला विज्ञान महाविद्यालया जवळून एका मोटार सायकल वरून आलेल्या दोघे कट मारून पुढे गेले. त्या नंतर त्या दोघांनी नांदूरघाट ते शिरूरघाट दरम्यान असलेल्या लवणात त्यांना मोटार सायकल आडवी लावून रस्त्यात अडविले. त्यावेळी मोटार सायकलच्या समोरील हेडलाईटच्या प्रकाशात ते दोघे नितीन सुनील जाधव व बबन पारधी असल्याचे त्यांनी ओळखले. त्या वेळी सुशील त्रिमुखे रा. नांदूरघाट हा देखील त्या ठिकाणी मोटार सायकल वरून आला. त्या नंतर बबन पारधी याने मोटार सायकल वरून उतरून शुभांगी हिच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे ४० हजार रु. किंमतीचे गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण (पट्टी वजा) बळजबरीने हिसकावुन घेवुन सुशील त्रिमुखे यांच्या मोटार सायकलवर बसला. नितीन जाधव हा दुसऱ्या मोटार सायकलवर बसुन बहीणीचे सोन्याचे मिनीगंठण घेवुन निघुन गेले.  दि. २३ एप्रिल रोजी अशोक सकींदर घुले यांच्या फिर्यादी वरून नितीन सुनील जाधव, बबन पारधी आणि सुशील त्रिमुखे सर्व रा. नांदुरघाट ता. केज या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. १३५/२०२२ भा. दं. वि. ३९२ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यातील एक आरोपी नितीन सुनील जाधव याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान आरोपी नितीन जाधव यास न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २७ एप्रिल पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस बबन पारधी आणि सुशील त्रिमुखे या दोघांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!