केज

डॉ. स्नेहल सावंत हिचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा — आयपीएस अधीक्षक एम. रमेश

गौतम बचुटे/केज/कळंब :- डॉ. स्नेहल सावंत हिने वैद्यकीय शिक्षणात मिळविले यश हे प्रेरणादायी असून तिचा आदर्श इतरांनी घ्यावा. वैद्यकीय क्षेत्र हे समाजसेवेसाठी समर्पित क्षेत्र असल्याचे मत सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कळंब येथील सहशिक्षक सोमनाथ सावंत यांची मुलगी डॉ. स्नेहल सावंत हिच्या वैधकीय शिक्षणातील यशा बद्दल आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमच्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

सावित्रीबाई फुले विद्यालयातील सहशिक्षक आणि कन्हेरवाडी ता. कळंब येथील सौ. नीता व सोमनाथ सावंत या दांपत्याची मुलगी डॉ. स्नेहल सावंत हिने वैद्यकीय शिक्षणातील अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होत इंटर्नशिप कालावधी पूर्ण केला आहे. त्या बद्दल माजी सैनिक आणि पोलीस नाईक पांडुरंग राऊत यांच्या धम्मदान बहुउद्देशिय संस्था व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ. स्नेहल सावंत हिच्या सत्काराचे आयोजन कल्पना नगर येथे लुंबिनी बुद्ध विहारात केले होते. या गुणगौरव व सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दलित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय कांबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस एम रमेश हे होते. तसेच भाजपचे सतपाल बनसोडे, प्रसिद्ध काननाकघसा तज्ज्ञ डॉ. आकाश बचुटे, माजी सरपंच वसुदेव सावंत पत्रकार गौतम बचुटे, माजी सैनिक बळीराम सावंत, गौतम शिंदे, गंधारीबाई सावंत, कालिदास सावंत आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!