केज

एकच घरकुल त्याचे दोन लाभार्थी; अन् दोनदा अनुदान !

गटविकास अधिकाऱ्यांचे खुलासा करण्याचे ग्रामसेवक आणि लाभार्थ्यास आदेश

गौतम बचुटे/केज :- एकच घरकुल बांधून त्याचे अनुदान उचलून पुन्हा तेच घरकुल दुसऱ्या लाभार्थ्यांच्या नावे नोंद करून पुन्हा त्याच घरकुलावर अनुदान उचलल्या प्रकरणी खुलासा करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना दिले आहेत.

देवगाव ता. केज येथील घरकुल योजनेचा लाभार्थी श्रीमती शांताबाई आण्णा गायकवाड यांनी त्यांच्या कुटूंबातील महिला सरपंच सौ. सुरेखा शिवाजी गायकवाड यांनी ग्रामसेवक धनंजय खामकर व स्वतः सरपंच यांनी ज्यांच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन यांनी सन २०१९-२० वर्षासाठी ग्रामपंचायत कार्यालय एक ठराव घेऊन देवगाव येथील अनसुचित जातीसाठी सुरु असलेल्या रमाई आवास योजनेतुन सहा लाभार्थ्यांना मंजुरी घेण्यात आली होती. या सहा लाभार्थ्यां पैकी शांताबाई आण्णा गायकवाड यांनी नवीन बांधकाम न करता त्यांचा मुलगा सरपंच पती शिवाजी आण्णा गायकवाड यांनी सन २०१२-१३ मध्ये मंजूर झालेले रमाई आवास योजनेतुन केलेले बांधकाम दाखवुन हेच सन २०१९ -२० चे घरकुल दाखवुन याचे १ लक्ष २० हजार रुपये शासनाचा निधी चा गौरवापर केला. तो निधी वसुल करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अशी गटविकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झालेली आहे.

त्या नुसार सदरील दोन्ही घरांचे अक्षांश-रेखांश प्रमाणे अंग्यूलर कॅम ॲपद्वारे फोटो घ्यावेत आणि जर सदर लाभार्थ्यांने घरकुल न बांधता निधीचा गैरव्यवहार केला असेल तर बांधकाम पूर्ण करावे अन्यथा सदर निधी शासनाच्या खात्यावर परत जमा करावा त्या बाबत दि. २५ एप्रिल २०२२ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी केज यांनी देवगावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना दिले आहेत.

” सदर प्रकरणी अहवाल प्राप्त होताच कार्यवाही केली जाईल.” —- विठ्ठल नागरगोजे, प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, केज

 

काय आहे प्रकरण :-

ग्रामपंचायत मिळकत क्र. ३९४ वर सन २०१२-१३ मध्ये सरपंच पती शिवाजी अण्णा गायकवाड यांनी रमाई आवास योजनेतून घरकुल बांधले. सन २०१९-२० त्याच जागेवर शांताबाई आण्णा गायकवाड यांना घरकुल मंजूर झाले परंतु त्यांनी बांधकाम न करता सरपंच आणि ग्रामसेवक व अधिकारी यांनी त्यांच्या धारण केलेल्या पदाचा गैरवापर करून निधीचा गैरव्यवहार केला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!