अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणावर गुन्हा

अंबाजोगाई/प्रतिनिधी:
वर्षभरापासून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड केली. त्यानंतर तिच्या घरात घुसून विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका तरुणावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता शहरातील एका विद्यालयात ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मागील वर्षभरापासून आकाश हा तरुण तिचा पाठलाग करून तिची छेडछाड करत होता. याबाबत पीडितेने तक्रार केल्यानंतर तिच्या आई वडिलांनी आकाशच्या आई वडिलांची भेट घेऊन त्रास न देण्याबाबत समजावून सांगितले होते. शुक्रवारी (१२ जून) दुपारी पीडितेची आई कार्यक्रमासाठी बाहेर जात असल्याचे पाहून आकाश पीडितेच्या घराकडे गेला आणि घरात घुसून तिचा विनयभंग केला. यावेळी संशय आल्याने पीडितेची आई कार्यक्रमासाठी न जाता घराकडे परतली असता तिला आकाश मुलीची छेड काढताना दिसून आला. याबाबत जाब विचारताच त्याने पीडिता आणि तिच्या आईवर बलात्कार करण्याची धमकी दिली. त्यांनंतर आईने पीडितेची आकाशच्या तावडीतून सुटका केली. अंबाजोगाई शहर ठाण्यात आकाश बनसाेडे याच्यावर विनयभांगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षाक मोनाली पवार करत आहेत.