केज

कु. प्रणिता गित्ते हिचा एम बी बी एस ला प्रवेश

गौतम बचुटे/केज :– केज तालुक्यातील साळेगाव येथील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी सतीश गित्ते यांची मुलगी कु. प्रणिता सतीश गित्ते हिला हैद्राबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.

तालुक्यातील साळेगाव येथील रहिवाशी असलेले सतीश गित्ते हे आरोग्य विभागात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी कु. प्रणिता गित्ते हिला राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षेद्वारे हैदराबाद येथील डॉ. पट्टनम महेंद्र रेड्डी वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रवेश मिळवीला आहे. प्रणिता हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केज येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण लातूर येथे झाले.
प्रणिता हिच्या वैद्यकीय शिक्षण एम बी बी एस च्या  प्रवेशा बद्दल वडील सतीश गित्ते, आई अरुणा गित्ते, कल्पना व उद्धव हे चुलती-चुलते आणि ग्रामस्थांतून अभिनंदन होत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!