अंबाजोगाई

खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्या- प्रा.जाधव

अन्यथा कुटुंबासह करणार जेलभरो आंदोलन

अंबाजोगाई/प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर १६ महिन्यापासून बंद असलेले खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी अन्यथा, कुटुंबासह जेलभरो आंदोलन करू असा इशारा कोचिंग क्लासेस असोसिएशनचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.गोविंद जाधव यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात गुरूवारी ( दि. १०) करण्यात आली आहे.
देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू असल्याने खाजगी कोचिंग क्लासेस दि.१४ मार्च २०२० पासून ते आजपर्यंत बंद आहेत. त्याच अनुषंगाने संपूर्ण राज्यात दि. १० जून २०२१ रोजी लॉकडाऊन चे काटेकोर नियम पाळून मानवी साखळी आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शिक्षण क्षेत्राचा दर्जा व निकाल सूधारण्यामध्ये कोचिग क्लासेसचे मोठे योगदान आहे, असे असुन सुद्धा या व्यवसायाला शासनामार्फत कुठलेही अनुदान,सोयी सवलती दिल्या जात नाहीत. खाजगी कोचिंग क्लासेस व्यवसाय कोरोना काळात संपूर्णतः ठप्प झाले आहेत, आमचे उत्पन्न १०० टक्के बंद झाल्याने खाजगी कोचिंग क्लासेस व्यावसायीक प्रचंड आर्थिक अडचणीत व विवंचनेत सापडले आहेत. खाजगी कोचिंग क्लासेसच्या जागेचे भाडे ,घरांचे हप्ते, घरांचे भाडे, बॅंकेचे कर्ज, शिक्षकांचे पगार,मुलांच्या शाळेच्या फिस हे संपूर्ण थकलेले आहे. त्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेस चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व बाबींचा सहानुभुती पुर्वक शासनाने विचार करून, सर्व नियमांचे पालन करण्याच्या हमीवर खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी अन्यथा कुटुंबासह जेलभरो आंदोलन करण्यात येईल. त्या दरम्यान कोणत्या ही आंदोलनकर्त्याच्या जीविताचे बरे-वाईट झाल्यास त्याला पूर्णपणे शासन जबाबदार असेल.अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे निवेदनावर कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रा.पी एम. वाघ ,राज्य कार्याध्यक्ष प्रा. प्रशांत बनसोड,राज्य सरचिटणीस प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे यांच्या नावासह बीड जिल्हाध्यक्ष प्रा.गोविंद जाधव,प्रा.संतोष देशमुख, प्रा. हरिदास गंगणे प्रा ढगे,प्रा नीले,प्रा अरसुडे,प्रा संजय देशमुख,प्रा.रमेश कुलकर्णी, प्रा.दयानंद मुंडे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!