पाटोदा

मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेत प्राधान्य द्या – कविता खेडकर

पाटोदा/ प्रतिनिधी:
देशात व राज्यात कोरोना सारख्या महामारी आजाराने हजारो जनांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक घरातील कर्ते व्यक्ती गमावले असल्यामुळे मायमाऊल्याना पुढे काय करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडॉऊन मुळे रोजगार बुडाला आहे. यामुळे मायबाप सरकारने शेतकरी आत्महत्या ग्रस्त महिलाना जसे संजय गांधी श्रावण बाळ योजनेत प्राधान्य आहे.
त्या प्रमाणे कोरोना मुळे ज्या महिलाने आपला पती गमवला आहे त्या विधवा माऊलीला संजय गांधी मध्ये तर ज्या आई बापाने आपला करता पुञ गमावला आहे त्या निराधार आई वडिलांना श्रावण बाळ योजनेत प्राधान्य द्यावे. अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त महिला सयोजक कविता ताई खेडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!