बीड

मराठवाड्यात मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे

बीड/ प्रतिनिधी

मराठवाडा हा पूर्वी हैदराबाद संस्थानात होता तिथे मराठ्यांना ओबीसींचा दर्जा होता. संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा विनाअट सहभागी झाला. मात्र, तत्कालीन सरकारने मराठा समाजाला ओबीसींचा दर्जा दिला नाही. मात्र, मराठवाड्यातील जे मराठे इतर राज्यात गेले त्यांना ओबीसींचा दर्जा तिथे दिला गेला. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची याचिका न्यायालयात आहे. शासनाकडेही तशी मागणी केली असून यासाठी मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संवाद यात्रा काढल्याची माहिती प्रा. प्रदीप सोळंकेंनी पत्रपरिषदेत दिली.

बीडमध्ये शासकीय विश्रामगृहावर प्रा. प्रदीप सोळंके, किशोर चव्हाण, योगेश वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रा. गोपाळ धांडे, विनोद चव्हाण, गंगाधर काळकुटे आदीची उपस्थिती होती. प्रा. सोळंके म्हणाले, मराठवाडा हा काही महाराष्ट्राचा म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे स्टेटचा भाग नव्हता. हैदराबाद संस्थानचा हा भाग होता. जेंव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा नागपूर व मराठवाडा हे २ वेगळे विभाग या राज्यात आले. नागपूर संस्थानने येताना काही अटी ठेवल्या तर मराठवाडा विनाअट सामील झाला. हैदराबाद संस्थानात मराठ्यांना कुणबी म्हणून आेबीसी आरक्षण दिले होते. उर्वरित महाराष्ट्रात ते आजही आहे. मात्र, तत्कालीन सरकारने मराठवाड्यातील मराठ्यांना ते दिले नाही. त्यामुळे इथल्या समाजावर मोठा अन्याय झाला. आता याबाबत न्यायालयात याचिका दाखल केलेली असून याबाबत कायदेशीर लढा सुरू आहे. संवाद यात्रेतून विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही माहिती घेत असून ११ जून रोजी औरंगाबादेत याचा समारोप होईल, असे म्हणाले.
पत्रकार परिषदेतून माहिती देताना प्रा. प्रदीप साळुंके म्हणाले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!