कृषीदेश-विदेश

हिंगोली जिल्ह्याती हळदीला जागतिक बाजारपेठेची मागणी !

हिंगोली: हळद उत्पादनात महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील हळदीला जागतिक बाजारपेठत स्थान मिळणार असून खा. हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) यांच्या अंतर्गत असलेल्या बीम (इएअट) या कंपनीशी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सूर्या व तुकाई फॉर्मर प्रोड्युसर कंपन्यांचा पॅकिंग, ग्रेडिंग आणि अद्यावत तंत्रज्ञानाने साठवणूक करण्यासाठी करार करण्यात आला आहे. सौंदर्यप्रसाधने, औषध निर्मिती आणि इतर प्रक्रिया उद्योगामध्ये हळदीची मागणी वाढावी, यासाठी हे पाऊल उचलले गेले असून यामुळे जिल्ह्यातील हळद उत्पादक समृध्दीकडे वाटचाल करण्याची आशा निर्माण झाली आहे.

हळद उत्पादकांसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभी करण्यासंदर्भात गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप या वित्तीय संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. खा. हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या करारावेळी बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, बीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिन्हा, बीएसईचे मुख्य व्यवसाय अधिकारी समीर पाटील, मुख्य नियामक अधिकारी नीरज कुलश्रेष्ठा, उपमहाव्यवस्थापक पिनाकीन दवे, रुद्र पाटील यांची उपस्थिती होती.

आपल्या देशात नियमित लागवड केली जाणारी हळद ही खाद्य आणि मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरली जाते, त्या अनुषंगाने आपण या पिकाची आजवर लागवड करत आलो आहोत. मात्र परदेशांमध्ये हळदीचा औषधासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोठ मोठ्या औषधी कंपन्या हळदीवर अनेक प्रयोग करत आहेत. राज्यात सांगलीनंतर हिंगोली जिल्हा हळद उत्पादनात आघाडीवर आहे. हिंगोली येथे हळद संशोधन प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने अनुमती दिली असून त्यासाठीची अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. त्या अभ्यास समितीवर हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. हळदीच्या नवनवीन संकरित बेण्याद्वारे आणि नव्या लागवड पद्धतीद्वारे हळद उत्पादन वाढविण्यासाठी हे महामंडळ काम करणार आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!