क्राईम डायरीबीड

सोन्याची साखळी पळवली

बीड/ प्रतिनिधी :
येथील जिल्हा क्रीडा संकुलात गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने एकाची १४ ग्रॅमची सोनसाखळी लंपास केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शाहूनगर भागात राहणारे विशाल केशव पवार हे मोर्चात ते सहभागी झाले होते. यावेळी गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पँटच्या खिशातील ३५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी पळवली. याप्रकरणी विशाल पवार यांचा तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक फौजदार न चक्रे करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!