क्राईम डायरीवडवणी

कार अपघातात ग्रामसेवक मुंडे ठार

वडवणी/प्रतिनिधी :
भरधाव वेगतील खासगी ट्रॅव्हल्स व कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाली . या अपघातात कारमधील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ( १६ जून ) पहाटे वडवणी जवळ परळी बीड महामार्गावर झाला.

राजेंद्र मुंडे हे सध्या हे बीड पंचायत समितीत कार्यरत होते . बुधवारी पहाटे ते काही कामानिमित्त कारमधून ( एमएच ०२ सिपी ५२२६ ) निघाले होते . ते परळी बीड रस्त्यावर देवडीजवळ असताना पुण्यावरून परळीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने ( एमएच २ ९ व्ही ७२२७) त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक केली. या अपघातात राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला . घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडवणी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!