पात्रुड येथे पकडला ३३ लाखाचा गुटखा

गौतम बचुटे/केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर अवैद्य धंद्या विरुद्ध धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. त्यातच काल माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मी राव यांच्या पथकाने जालन्याकडे जाणारा ३३ लाख रु. गुटखा व ट्रक पकडला.
दि. २६ एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आज रात्री ट्रक क्र.(के ए- ५६/५४१३) मध्ये कर्नाटक राज्यातील संगारेड्डी येथून गोवा आणि गुटख्याचा माल भरून तो ट्रक माजलगाव मार्गे जालना येथे चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे. अशी माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी ही माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांना देऊन कारवाईच्या सूचना दिल्या. त्या नंतर रश्मीता राव आणि पंकज कुमावत पथकातील बालाजी दराडे राजू वंजारे, सचिन अहंकारे धोंडीराम मोरे, अतिशकुमार देशमुख व युराज चव्हाण यांनी दि. २७ एप्रिल रोजी रात्री २:०० वा. पात्रुड येथे सापळा लावला. ल त्यावेळी तेलगावकडून माजलगावकडे ट्रक क्र.(के ए ५६/५४१३) जाताना दिसताच पोलीस पथकाने ट्रक थांबून ट्रक चालकास ताब्यात घेतले. त्या ट्रकची पाहणी केली असता त्यात गोवा व गुटख्याचे मोठे ३१ भोत ज्याची किमत ३३ लाख २४ हजार ७५० रु व ट्रक व मोबाईल किंमत असा एकूण ३९ लाख ३९ हजार ७५० रु. चा मुद्देमाल मिळून आला.
पोलीस नाईक बालाजी दराडे यांचे फिर्याद वरून ट्रक ड्रायव्हर व गुख्याच्या मालका विरुद्ध माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.