हमीदखान पठाण यांची निवड

पाटोदा /प्रतिनिधी
शहरातील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते हमीदखान पठाण यांची स्मशानभूमी/कब्रस्थान बचाव संघर्ष समितीच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे.
हमीदखान पठाण यांनी आत्तापर्यंत विविध माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. व आपल्या लेखनीच्या माध्यमातून अनेक प्रकरणाला वाचा फोडली आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन सोमवार ( दि. ७) रोजी अशोक सोनवणे संस्थापक अध्यक्ष स्मशानभूमी तथा कब्रस्थान बचाव संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, राजाराम जाधव कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सुधाकर धुरंधरे सचिव म.रा.या मान्यवरांच्या हस्ते स्मशानभूमी तथा कब्रस्थान बचाव संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या पाटोदा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.यांवेळी जेष्ठ पत्रकार अब्दुल कादर मकराणी,छगन मुळे,मराठी पत्रकार परिषदेचे ता.अध्यक्ष तथा आमदार सुरेश धस यांचे स्वीयसाहयक सोमिनाथ कोल्हे, जि.उपाध्यक्ष पोपट,कोल्हे,श्रीरंग लांडगे, दयानंद सोनवणे, सा. का. डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर), नगरसेवक विजय जोशी, महेश बेदरे,अजय जोशी, सुधीर एकबोटे, शेख जावेद,अँड.जब्बार पठाण,डिगंबर नाईकनवरे,संजय सानप,सोमनाथ खंडागळे,नगरध्यक्ष गणेश नारायणकर माजी सरपंच किशोर अडागडे, दिव्यांगं संघर्ष समितीचे जि.अध्यक्ष शेख जिलानी,पत्रकार अजिज शेख,चर्मकार महासंघाचे दिनेश नारायणकर,जितेंद्र सागळे,सभापती श्रीहरी गिते पाटील, यांच्यासह अनेक मान्यवरांनी विविध माध्यमातून शुभेच्छा दिल्या.