अंबाजोगाईक्राईम डायरी
अंबाजोगाई तालुक्यात विवाहितेवर अत्याचार

अंबाजोगाई: तालुक्यातील एका २९ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना १३ फेब्रुवारी २०२२ घडली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवार दि. ११ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी सचिन श्रीकृष्ण पवार याने पीडित महिलेस शेतात एकटे गाठून जबरदस्तीने अत्याचार केला. आरडाओरड केल्यानंतर आरोपी निघून गेला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल केंद्रे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.