केज

होळच्या दोन तरुणांनी वाचविले हरिणाच्या पाडसाचे प्राण

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील होळ येथे कुत्र्याच्या तावडीतून दोन तरुणांनी एक महिन्याच्या वयाचे हरिणाच्या पाडस जिवाची पर्वा न करता वाचविले.

या बाबतची माहिती अशी की, होळ येथील शिवारात दि. २३ मार्च बुधवार सायंकाळी ६:०० वा च्या दरम्यान होळ ते कोदरी रस्त्यावर एक महिन्याचे हरिणाचे पाडस कळपातुन चुकले होते. त्या हरिणाच्या पाठीमागे कुत्रे पाठलाग करीत होते व त्यामुळे ते भयभीत पाडस सौरावैरा पळत होते. हे दृश्य होळ येथील शुभम भिसे आणि नितीन मोरे या दोन तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या पाडसाचे प्राण वाचविले. नंतर त्या भयभीत पाडसाला घेऊन केज पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी धारूर वनविभागाचे शंकर वरवडे यांच्याशी संपर्क साधला. त्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पत्रकार गौतम बचुटे यांच्या उपस्थितीत शुभम भिसे आणि नितीन मोरे यांनी वनरक्षक श्रीमती सारिका मोराळे यांच्या ताब्यात हरिणाचे पाडस दिले.  या वेळी वनरक्षक संभाजी पारवे, वचिष्ठ भालेराव आणि चालक शाम गायसमुद्रे हे उपस्थित होते. पाडसाचे प्राण वाचविल्या बद्दल शुभम भिसे आणि नितीन मोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गोरक्ष गडावर होणार पाडसाचे संगोपन :-  वनविभागाच्याव वतीने गोरकक्ष गडावर हरिणांसाठी संरक्षित वनक्षेत्र तयार केलेले असून तेथे या पाडस सोडण्यात येणार आहे.

– सारिका मोराळे,  वनरक्षक, धारूर

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!