आपेगाव येथे शेतकऱ्याचे कुऱ्हाडीने डोके फोडले

केज/ प्रतिनिधी:
तू या रस्त्याने का जातोस असे
म्हणत एका 31 वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यात कु-हाड मारून डोके फोडत काठीने व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना आपेगाव (ता. अंबाजोगाई) येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
आपेगाव येथील अजय अनंत तट (वय 31) व पुरुषोत्तम लोमटे हे दोघे 17 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास रस्त्याने जात होते. यावेळी सुशिल राजाभाऊ तट, राजाभाऊ वामन तट, स्वप्निल
राजाभाऊ तट यांनी तु या रस्त्याने का जातोस, आठ दिवसा आगोदर आमच्या हाताने वाचलास, आता तुला जिवेच मारतो असे म्हणुन अजय तट यांना शिवीगाळ करुन सुशील तट याने कु-हाड डोक्यात
मारुन गंभीर जखमी केले. तर राजाभाऊ तट याने हातातील दगडाने डावे हाताचे करगंळीवर मारुन दुखापत करीत काठीने व दगडाने पाठीत मारहाण करुन मुक्कामार दिला. तर स्वप्नील तट याने
शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. 25 जून रोजी अशी फिर्याद अजय तट यांनी दिल्यावरुन सुशिल तट, राजाभाऊ तट, स्वप्निल तट यांच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल
झाला आहे. पोलीस नाईक पांडुरंग वाले हे पुढील तपास करत आहेत.