पाटोदा

विहीर फोडण्याचे काम करणाऱ्या समाजाला विनामूल्य आरोग्य सेवा:- डाॅ.गणेश ढवळे

पाटोदा/प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील मौजे वैद्यकिन्ही येथे पालावर वास्तव्य करीत विहीर फोडण्याचे काम करणा-या लोकांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

ग्रामसमृद्धी चळवळ अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्यामार्फत ही विनामूल्य आरोग्य तपासणी, औषधोपचार व कोरोना विषयक जनजागृती करण्यात येत असून ग्रामस्थांच्या शंकाकुशंकाचे निर्सण करण्यात येत आहे. त्या अंतर्गत दि. शुक्रवार ( दि. ११) पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील विहीर फोडण्याचे काम करणा-या लोकांना आरोग्य सेवा देण्यात आली. विहीर फोडण्याचे काम करून पोटं भरतात,परंपरागत विहीर फोडण्याचे कठीण काम त्यातच शिक्षणाचा गंध नाही,त्यातुनच अज्ञान आदि. गोष्टींमुळे कोरोना विषयक गैरसमजुतीतुन दवाखान्यात जाण्यासाठी टाळाटाळ, त्यातच आर्थिक ओढाताण, शासकीय कोणत्याही योजनांचा लाभ नाही, त्यापासून वंचित असून त्यामुळेच या गरजुवंतांना विनामूल्य आरोग्य सेवा देण्याच्या हेतुने गावोगावी जाऊन आरोग्य सेवा देण्याच्या उपक्रमांतर्गत पालावरील आजारी महिला, पुरूष,बालकांची तपासणी, व औषधोपचार सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी दिली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!