बेनसुर गावात विनामूल्य आरोग्य सेवा

पाटोदा/ प्रतिनिधी
ग्रामिण भागातील दवाखाने, औषधीदुकान आदि नसलेल्या आडवळणी गावातील वस्त्या, तांड्यावर सामाजिक भावनेतून कोरोना कालावधीत ग्रामसमृद्धी चळवळ अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर आयोजित विनामूल्य तपासणी व औषधोपचार आरोग्य सेवा देत कोरोनाविषयक जनजागृती करण्याचा उपक्रम राबवला जात आहे.
शनिवारी ( दि. १२) पाटोदा तालुक्यातील मौजे बेनसुर या गावामध्ये विनामूल्य आरोग्य सेवा शिबिर ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित करण्यात आले होते, वयोवृद्ध महिला, पुरूष, आदिंची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले, कोरोना आजारा विषयी काळजी न करता काळजी घ्यावी, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे , अनावश्यक गर्दी टाळावी आदि सुचना देतानाच ग्रामस्थांच्या शंकाकुशंकाचे निरसण करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच परसराम आर्सुळ, रामराव आर्सुळ, बबन खोले,बाळासाहेब आर्सुळ, दिलीप आर्सुळ, तात्यासाहेब आर्सुळ आदिंनी उपक्रमास सहकार्य केले.