केजक्राईम डायरी
पायी चालणारे व्यक्तीस वाहनाने चिरडले

केज/ प्रतिनिधी:
गावाकडे पायी निघालेल्या व्यक्तीचा अवजड वाहनाने चिरडल्याने जागीच मृत्यूची झाल्याची घटना नेकनूरजवळ मंगळवारी (२२ जून) रात्री घडली.
संजय मारुती राऊत (वय ४३, रा. कानडी माळी ता.केज) असे त्या मयत व्याक्चे नाव आहे. संजय हे चौसाळा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु मंगळवारी रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान तिकिटाला पैसे नसल्याने नेकनूरहून गावाकडे परत पायी निघाले होते. मात्र नेकनूर शेजारील पुलाच्या जवळ आले असता त्यांना पोकलेन मशीन वाहून नेणाऱ्या अवजड वाहनाने (एमएच १६ एवाय ५५३३) चिरडले. या भीषण अपघातात संजय राउत यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सदरील वाहनाच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.