केज

नामदेवच्या आयुष्यासाठी आर्थिक मदतीची गरज : पुण्यात रुबी हॉलला नामदेव करतोय जगण्याचा संघर्ष

गौतम बचुटे/केज:   तालुक्यातील साळेगाव येथील संजय उर्फ बिट्टू दादाराव कळसकर यांचा मुलगा चि. रामेश्वर संजय कळसकर उर्फ नामदेव वय (२३ वर्ष) याला तिव्र हृदय विकाराच्या झटक्यामुळे लातूर येथून पुणे येथे रुबी हॉलला भरती केले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तेथील खर्चिक आणि महागड्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी दानशुर व्यक्तिनी पुढे येण्याची गरज आहे.

नामदेव उर्फ नामू संजय कळसकर हा अवघ्या २३ वर्षाचा तरुण आहे. तो वीज वितरण कंपणीच्या युसूफवडगाव सहाय्यक उपअभियंता कार्यालया अंतर्गत कंत्राटी तंत्रज्ञ म्हणून काम करीत आहे. परंतु दुर्दैवाने त्याला दि. १४ फेब्रुवारी रोजी त्याला हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्याला लातूर येथून पुणे येथील रुबी हॉलला हलविले आहे. त्यांची प्रकृती अतिशय नाजुक आहे. सध्या रुबी हॉल पुणे येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून उपचार सुरू आहेत. मात्र त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. सर्व उपचारांसाठी लागणारी रक्कम खूप मोठी आहे. त्याचे नुकतेच लग्न देखील जमले आहे. रामेश्वर (नामु) च्या परिवाराला पैसे जमा करणे खूप अवघड आहे.  त्यामुळे नामदेवचा जगण्याचा संघर्ष सुरू असून त्याच्यासाठी ज्यांना जे शक्य होईल ती मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आर्थिक मदतीसाठी त्यांचे भाऊ यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे.

मदतीसाठी संपर्क :-

राहुल संजय कळसकर (नामुचे मोठे बंधू)

स्टेट बँक ऑफ इंडिया SBI

IFSC :- SBIN0011128

A/C No.  :- 20371287854

फोन-पे :- 7721881009

गुगल-पे :-7721881009

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!