क्राईम डायरीमाजलगाव

हॉटेल चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

माजलगाव/प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे झालेल्या आर्थिक अडचणीला कंटाळून येथील जुन्या कोर्ट रोड परिसरात हॉटेल व्यवसाय करणारे सुरेश तुकाराम सुपेकर (५३) यांनी हॉटेलमध्येच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. ७) पहाटे घडली.
येथील जुन्या कोर्ट रोड परिसरात सुरेश सुपेकर हे मागील अनेक वर्षांपासूनहॉटेल व्यवसाय करीत होते. मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडलेला होता. सोमवारपासून सर्व व्यवसाय सुरू होणार म्हणून हॉटेलची साफसफाई करण्यासाठी ते घरून पहाटे ५ वाजता हॉटेलमध्ये आले होते. परंतु बराच वेळ होऊनही ते अंघोळीसाठी घरी न आल्याने त्यांचा मुलगा शुभम सुपेकर हा पाहण्यासाठी आला. परंतु त्याला शटर लावलेले दिसले. त्याने शटर उघडून पाहिले असता सुरेश यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!