अंबाजोगाईक्राईम डायरी

धानोरा येथे माजी सरपंचाचे घर फोडले; दागिने चोरी

अंबाजोगाई: तालुक्यातील धानोरा खुर्द येथील एका माजी सरपंचाचे घर फोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरल्याची घटना मंगळवारी ( दि. २२) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

धानोरा खुर्द येथील माजी सरपंच सुरेश बब्रुवान जगताप ( वय: ४४) हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील कपाटांमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेल्या साडेतीन तोळ्याच्या सोन्याच्या दोन पाटल्या अंदाजे ६९ हजार रूपये किमतीच्या चोरून नेल्या. या प्रकरणी सुरेश जगताप यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस जमादार खेडकर पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!