क्राईम डायरीमाजलगाव
राजेगाव येथे घरफोडी, दीड लाखांचा रक्कम पळवली

माजलगाव / प्रतिनिधी
तालुक्यातील राजेगाव येथील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत १ लाख ४८ हजार ७०० रुपयांची सोन्याचे दागिने व नगदी रक्कम चोरल्याची घटना सोमवारी ( दि. ७) घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शेतकरी व किराणा दुकानदार जगदीश रामलाल मालू यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने व नगदी रोख रक्कम असा १ लाख ४८ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.