केजक्राईम डायरी
शेतात शेळी गेल्याने पती – पत्नीस मारहाण

केज/ प्रतिनिधी:
शेतात शेळी गेल्याच्या कारणावरून पती-पत्नीस मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील लाडेवडगाव येथे दि. २३ रोजी घडली. याप्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील लाडेवडगाव येथील रामधन नामदेव शेप यांची शेळी बाबासाहेब नामदेव शेप यांच्या शेतात गेल्याच्या कारणावरून रामधन शेप यांना दगड मारून हानवटीस चावा घेऊन दुखापत केली. तर त्यांची पत्नी दैवशाला हिच्या डोक्यात कुराड मारून दुखापत करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमक्या दिल्या. याप्रकरणी रामधन नामदेव शेप यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब नामदेव शेप, सुनिता बाबासाहेब शेप ( रा. लाडेवडगाव ) यांच्यावर युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोकॉ. डोईफोडे करीत आहेत