क्राईम डायरीवडवणी

अंगणवाडीतील बालकांचा खाऊ चोरला !

वडवणी/ प्रतिनिधी
तालुक्यातील बिचकुलदरा तांडा येथील अंगणवाडी केंद्राचा दरवाजा तोडून आतमध्ये ठेवलेला पोषण आहार (खाऊ ) चोरून नेल्याची घटना ७ ते ८ जूनच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिचकुलदरा तांडा येथे असलेल्या अंगणवाडी केंद्राचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश करीत खोलीमध्ये ठेवलेला ३ ते ६ वर्ष वयोगटातील ३४ लाभार्थ्यांचा, २८ लाभार्थ्यांचा टीएचआर आणि १४ गरोदर /स्तनदा मातांचा पोषण आहार. ज्यामध्ये तांदूळ, चना, मुदडाळ पुढे, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ पुढे, साखर यांचा समावेश होता. चोरट्यांनी १४ हजार ६८० रूपये किमतीचा माल चोरून नेला. अंगणवाडी सेविका शालू गोविंद राठोड यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपो जायभाय करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!