अंबाजोगाई

खाजामिया पठाण यांची वंचित बहुजन आघाडीच्या अंबाजोगाई तालुकाध्यक्ष पदी निवड

अंबाजोगाई: वंचित बहुजन आघाडी च्या तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून
अंबाजोगाई तालुकाध्यक्ष पदी खाजामिया पठाण यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी च्या जिल्हास्तरीय आणि तालुका च्या कार्यकारणी ची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये शैलेश कांबळे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. अंबाजोगाई तालुका आणि शहर कार्यकारणी नव्याने करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा ऍड प्रकाश आंबेडकर, प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई तालुका अध्यक्ष म्हणून खाजामिया पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अंबाजोगाई शहराध्यक्ष पदी गोविंद मस्के यांची निवड करण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुका कार्यकारणी त महासचिव राहुल कासारे, सुभाष चोपडे, मेघराज कांबळे,उपाध्यक्ष ऍड सुभाष जाधव, सागर ओगले, प्रसिद्धी प्रमुख सतीश सोनवणे, मुन्ना वाघमारे नांदडीकर, प्रवक्ता रहमान पटेल (धानोरा)यांची निवड झाली असून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!