जिल्ह्याचं राजकारणमाजलगाव

माजलगावचे अप्पासाहेब जाधव जिल्हाप्रमुखपदी

माजलगाव/ प्रतिनिधी:
शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुखपदी माजलगावचे अप्पासाहेब जाधव
यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आली आहे. निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

त्यांच्याकडे माजलगाव, केज आणि परळी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेनेच्या बीड, लातूर जिल्ह्याच्या पदाधिकारी निवडी जाहिर झाल्या. त्यानुसार जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्याकडून माजलगाव, केज, परळी
विधानसभा मतदार संघाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. तर, माजलगावचे आप्पासाहेब जाधव यांना जिल्हा प्रमुख बीड शिवसेना म्हणून माजलगाव, केज आणि परळी विधानसभा मतदार संघाची नियुक्ती दिली आहे. सचिन मुळूक यांना हा अनपेक्षित धक्का आहे. याच सोबत गणेश वरेकर व शिवाजी कुलकर्णी यांची उपजिल्हा प्रमुख म्हणून वर्णी लागली आहे. शिवसेनेकडून मोठा काळानंतर
माजलगावला न्याय दिल्याचे बोलले जात आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!