बीड

सावता परिषदेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन!

बीड / प्रतिनिधी :  ज्ञानज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या १२५व्या स्मृतीदिनानिमित्त सावता परिषदेच्या वतीने शहरातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती माता सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी ओबीसीचे नेते लक्ष्मण दादा ढवळे, सावता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक नामदेवराव दूधाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सचिन दूधाळ, नगरसेवक विशाल घाडगे,सावता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील शिंदे,युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष ईश्वर राऊत, संतराम पानखडे,रमेश मदने, धनंजय कुलकर्णी,अतुल काळे, ज्ञानेश्वर देवळकर आदिंजण उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!