छबिना मिरवणुक व जंगी कुस्त्यांच्या दंगलीने रामजन्मोत्सवाची उत्साहात सांगता.

युसूफवडगांव/प्रतिनिधी:- केज तालुक्यातील युसूफवडगांवचे ग्रामदैवत असलेल्या प्रभु श्रीरामचंद्र यांचा पाडव्यापासुन सुरू असलेल्या रामजन्मोत्सवाची सांगता आज छबिना मिरवणुक,शोभेची दारू उडवुन व जंगी कुस्त्यांच्या दंगलीने आनंदीमय वातावरणात झाली.
युसूफवडगांव येथे सुरू असलेल्या रामजन्मोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी मध्यरात्री प्रभु श्रीराम यांच्या छबिना मिरवणुक पालखी निघाली पालखीत स्वार होऊन देव मारूती मंदिराच्या विसावतात यावेळी मिरवणूक पालखी समोर डिजेच्या तालावर वृद्धापासुन ते तरूणांनी एकच ताल धरला होता पालखी विसावल्यानंतर शोभेची दारू उडवण्यात आली तर पालखी समोर भारूडाच्या जुगलबंदिने गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले.तर दुपारी ४ वाजेच्या सुमारास अमराईत कुस्त्यांच्या जंगी दंगलींना सुरूवात झाली यावेळी गावोगाऊन आलेल्या पैहलवानांनी जोरदार प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.