केजक्राईम डायरी

सासरवाडीला गेलेला जावई बेपत्ता

गौतम बचुटे/केज :- पत्नीला भेटायला सासरवाडीला गेलेला जावई बेपत्ता झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, आशुतोष सुनील कोकाटे वय २२ वर्ष रा. खोडस ता. केज हा दि. ८ मे रविचार रोजी त्याची पत्नी निकिता हिला भेटायला चिंचोली माळी येथे गेला होता. पत्नीला भेटल्या नंतर तो चिंचोली माळी येथे राहणाऱ्या त्याच्या मावशीला भेटून गावाकडे जातो म्हणून गेला. मात्र तो चार दिवस झाले तरी घरी आला नाही. त्याचा मोबाईलही बंद आहे. म्हणून त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला; तरी तो आढळून आला नाही. म्हणून दि. १२ मे रोजी त्याच्या नातेवाईकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांना सांगितला. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली असून आशुतोष हा कोणाला आढळला किंवा त्याच्या बाबतीत माहिती उपलब्ध झाल्यास पोलीसांना माहिती देण्याचे आव्हान केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!