महाराष्ट्र

चणकापुरच्या एकलव्य शाळेत छञपती शाहुराजे जयंती उत्साहात साजरी

नाशिक/ प्रतिनिधी:
जिल्हातील चणकापुर येथील एकलव्य मॉडेल स्कुल येथे राजर्षी शाहुमहाराज यांची जयंती शनिवारी ( दि. २६) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्यासह कर्मचा-यांनी अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

आदिवासी विकास विभागाच्या कळवण तालुक्यातील चणकापुर येथिल एकलव्य मॉडेल रेसिडेंन्शिअल स्कुल येथे, आरक्षणाचे जनक लोकराजे छञपती शाहु महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी छञपती शाहुमहाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पन करुन अभिवादन केले. प्रसंगी प्राचार्य गजानन गायकवाड पाटील यांनी शाहुमहाराजांच्या जीवनचरीञावर प्रकाश टाकुन त्यांच्या कार्याचे महत्व सांगीतले. यावेळी अधिक्षक सुनिल पवार, क्रीडाशिक्षक हनुमंत येडले, दिपक थोरात, आरोग्य शिक्षीका ज्योती चौरे आदी कर्मचा-यांची उपस्थिती होती.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!