अंबाजोगाईक्राईम डायरी

गाडीच्या डिकीत ठेवलेल्या दागिन्यासह गाडी घेऊन चोरटे फरार

अंबाजोगाईत भर दिवसा घडला प्रकार

अंबाजोगाई: स्कुटीच्या डिकीत ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यासह स्कुटी घेऊन चोरटे फरार झाल्याची घटना अंबाजोगाई शहरात भरदिवसा सोमवारी ( दि. ७) सकाळी १० वाजता घडली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई शहरातील सोन्याचा व्यापारी राहुल राठोड यांनी रविवारी रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी शटरच्या कुलुपात फेवीक्विक इतर साहित्य टाकून शटरच्या कुलूपा चे तोंड बंद केले होते. सोमवारी सकाळी राठोड नेहमीप्रमाणे स्कुटीच्या डिकीत सोन्याचे दागिने घेऊन दुकानाकडे आले. परंतु, कुलूप उघडत नसल्याने ते स्कुटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चावीवाल्याकडे गेले. यावेळी ते चावीवाल्यासोबत बोलत असताना चोरट्यांनी त्यांची स्कुटी घेऊन पळ काढला. सोनार राठोड यांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने स्कुटीच्या डिकीत ठेवले होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!